माहेश्वरी घराण्याचा प्रभावी वारस अजयजी माहेश्वरी भाजपात

 

 

लोकवेध न्यूज नेटवर्क

 

 

उमरखेड शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात स्वच्छ प्रतिमा, शिस्तबद्ध कार्यशैली आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा नाईक माहेश्वरी घराण्यातील वारसा पुढे नेत अजयजी माहेश्वरी यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक, माजी मंत्री सुधाकरराव नाईक, मनोहरभाऊ नाईक यांच्यासारख्या प्रभावी नेतृत्वाशी निकट संबंध आणि त्यांचे मार्गदर्शन घेत वाढलेले हे घराणे दीर्घकाळापासून सामाजिक राजकीय सेवेसाठी ओळखले जाते.याच घराण्यातील द्रष्टे नेतृत्व म्हणजे स्व.जेठमलजी माहेश्वरी ज्यांनी उमरखेड व परिसरातील असंख्य गरिब कुटुंबांना घरकुले दिली, अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि वसंत सहकारी साखर कारखाना आमच्या भागात व्हावा या भूमिकेवर ठाम राहून विकासाचा पाया रचला.त्यांचे सुपुत्र स्व. सुरेशचंद्र माहेश्वरी, वसंत कारखान्याचे जनक म्हणून ओळखले जातात. याच दृष्टीने पुढे जाणारा वारसदार म्हणजे अजयजी माहेश्वरी, ज्यांनी आता अधिकृतपणे भाजपात प्रवेश घेतला आहे.

 

या ,पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची दिमाखदार उपस्थिती राहिली. यावेळी जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा,आमदार किसनराव वानखेडे,माजी आमदार विजयराव खडसे,माजी आमदार नामदेवराव ससाने,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण,बाळासाहेब भट्टड, विवेकभाऊ कन्नावार, महेशभाऊ काळेश्वरकर,सविता ताई पाचकोरे, अरविंदभाऊ धबडगेसह मोठ्या संख्येने उपस्थित उत्साही कार्यकर्त्यांनी या प्रवेश सोहळ्यास विशेष उपस्थिती दर्शवली.

 

 

⬛ अजयजी माहेश्वरी यांच्या प्रवेशाने भाजपाला मिळाला एक प्रभावी वारसदार

 

राजकारणातील ही त्यांची अधिकृत पहिली पायरी मानावी लागेल. नितीनभाऊ भुतडा यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या शब्दांवरील विश्वासातून अजयजी यांची भविष्यातील वाटचाल निश्चित होत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.सामाजिक कार्य, विश्वास, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख विचारांची परंपरा असलेल्या माहेश्वरी कुटुंबातील एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व आता भाजपात दाखल झाल्याने उमरखेड तालुका व जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे आकार

घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या