पाळीव कुत्र्यांच्या आरोग्यासाठी पुढाकार; मुडाण्यात उद्या मोफत लसीकरण
लोकवेध न्यूज नेटवर्क / २७ सप्टेंबर.
महागाव :-
पाळीव कुत्र्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासोबतच विविध संसर्गजन्य आजारांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुडाणा येथे उद्या, २८ सप्टेंबर रोजी मोफत श्वान लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत गावातील पाळीव कुत्र्यांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना,मुडाणा येथे सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या कुत्र्यांना घेऊन निर्धारित वेळेत लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे. कुत्र्यांचे नियमित लसीकरण केल्याने त्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते तसेच काही संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासही हातभार लागतो.
त्यामुळे मुडाणा परिसरातील सर्व पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी या मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा,असे मूडाना पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

