महागाव बाजार समितीचे सभापती गुलाबराव जाधव यांच्यावर अविश्वास ठराव

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव लोभा जाधव यांच्याविरोधात १८ पैकी १६ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. हा प्रस्ताव आज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला.संचालकांनी सभापतींच्या मनमानी कारभार, गैरव्यवहार, संचालक मंडळाला विश्वासात न घेता घेतलेले निर्णय आणि शेतमाल खरेदी प्रक्रियेत होणारी लूट या कारणांवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रस्तावावर १६ संचालकांच्या स्वाक्षऱ्या असून एक संचालक प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांना तीन दिवसांनी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संचालकांमध्ये अविश्वास ठराव मंजूर करण्याचा निर्धार दिसत असल्याने सभापती गुलाबराव जाधव यांना पद गमवावे लागू शकते, अशी चर्चा आहे.या घडामोडींमुळे बाजार समितीच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
⬛ या संदर्भात मी अनभिज्ञ आहे, गुलाबराव जाधव,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव.
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी , एक कुटूंब प्रमुख या नात्याने माही जबदारी इमानदारीने निभावली आहे. ज्या संचालकांनी माझे विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असेल. त्यांनी माझ्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित न करता मी कुठे चुकलो याचे प्रत्युत्तर द्यावे.मी या संदर्भात पूर्णपणे सक्षम आहे.
