पुढील ३ तास धोक्याचे ! वर्धा,यवतमाळमध्ये गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल 

वर्धा / यवतमाळ 

पुढील तीन तासांत वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा मंत्रालय, मुंबईकडून देण्यात आला आहे.

अचानक बदललेल्या हवामानामुळे विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः शेतकरी, प्रवासी आणि उघड्यावर काम करणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने पिके व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी,असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विजेपासून बचावासाठी झाडाखाली उभे राहणे टाळावे व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या