तहसील कार्यालयात शीतल पाण्याची सुविधा; गोदावरी अर्बन मल्टीस्टेटकडून वॉटर कूलर भेट

लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ जून.

 

महागाव :- 

 

सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सुविधेसाठी पुढाकार घेत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नांदेडच्या महागाव शाखेने तहसील कार्यालय, महागाव येथे वॉटर कूलर भेट देत समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे.

 

संस्थेच्या २३ मे २०२६ रोजी झालेल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. तहसील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने संस्थेने वॉटर कूलर सप्रेम भेट दिला.

 

या कार्यक्रमास तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अभय मस्के प्रमुख उपस्थित होते.तसेच गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., नांदेडचे सहायक महाव्यवस्थापक (AGM) रवी इंगळे यांची विशेष उपस्थिती लाभली.

 

वॉटर कूलरचे उद्घाटन रवी इंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.

 

हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक नामदार हेमंतभाऊ पाटील, अध्यक्षा सौ. राजश्रीताई पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापकीय संचालक तांबेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. उपमहाव्यवस्थापक सौ. सुरेखा दवे तसेच सहायक महाव्यवस्थापक श्री. रवी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

कार्यक्रमास शाखा महागावचे शाखाधिकारी शशांक ढोबळे, असिस्टंट ऑफिसर सचिन हिंगाडे, कु. जया घड्याले, ज्युनिअर ऑफिसर रामेश्वर शिंदे, सुयोग साकळे, ओमकुमार भोयर, अमोल रावते, प्रवीण आढागळे तसेच शाखेतील इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

तहसील कार्यालयात बसविण्यात आलेल्या या वॉटर कूलरमुळे दररोज येणाऱ्या शेकडो नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य सातत्याने करणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या