यवतमाळ जिल्ह्यात आज सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

लोकवेध न्यूज नेटवर्क / ३१ जुलै.

यवतमाळ:-


यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.


जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले व पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, पाण्याखाली गेलेले रस्ते किंवा पूल ओलांडू नयेत तसेच विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पूर्वनियोजित परीक्षा असल्यास त्या संबंधित विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या