शेतकऱ्यांच्या विकासाला नवी दिशा; बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या सह-अध्यक्षपदी प्रकाश पाटील देवसरकर यांची नियुक्ती

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ जुलै.

 

महागाव :- 

 

 

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना समितीच्या सह-अध्यक्षपदी उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचे पक्कीकरण करून शेतकऱ्यांना वर्षभर सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या योजनेमुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्चात मोठी बचत होणार आहे.

प्रकाश पाटील देवसरकर यांच्या सह-अध्यक्षपदी नियुक्तीमुळे उमरखेड-महागावसह राज्यातील ग्रामीण रस्ते विकासाला चालना मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध राजकीय, सामाजिक व शेतकरी संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या