शंभरात शंभर! महागावच्या आरती गाढबैलेची MS-CIT परीक्षेत तालुक्यात अव्वल भरारी ‘श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’चा आणखी एक मानाचा तुरा; १०० पैकी १०० गुण मिळवत आरतीची दैदिप्यमान कामगिरी

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १५ जुलै.

 

महागाव :- 

 

महागावच्या श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या MS-CIT परीक्षेत संस्थेची विद्यार्थिनी कु. आरती गाढबैले हिने १०० पैकी १०० गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.आरतीने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि नियमित सरावाच्या बळावर हे दैदिप्यमान यश संपादन केले. तिच्या यशामागे संस्थेचे संचालक मंगेश पाटील वानखेडे यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

 

या उल्लेखनीय यशानिमित्त श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये विशेष गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आरतीचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोलताना संस्थेचे संचालक मंगेश पाटील वानखेडे म्हणाले, “आरतीचे यश प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन, प्रामाणिक मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. भविष्यातही संस्थेतून असेच गुणवंत विद्यार्थी घडत राहतील.

आरती गाढबैले हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,शिक्षक आणि श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीला दिले.या सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरतीच्या या अभूतपूर्व यशामुळे महागावच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या