पोलीस स्टेशन महागाव येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी वसीम शेख यांची पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पदोन्नतीनिमित्त ग्रुपमधील सदस्य, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यावेळी वसीम शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या पदोन्नतीनिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा मी आयुष्यभर विसरणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या सदिच्छा मी मनापासून स्वीकारतो. भविष्यातही असेच प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहावेत, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”
त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सेवाकार्यातही ते कर्तव्यनिष्ठपणे जनतेची सेवा करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.