भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत महागाव शहरात विशेष मतदार नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून प्रभाग क्रमांक ०८ मधील हनुमान मंदिराजवळ हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये मतदार यादीतील पडताळणी, SIR-2026 नोंदणी फॉर्म भरणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आदी कामे करण्यात येणार आहेत. महागाव शहरातील पात्र मतदारांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली मतदार नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा तसेच तहसीलदार अभय मरस्के यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर नगरसेवक विशाल पांडे (प्रभाग क्र. ०९) आणि नगरसेवक परवेज सुरैया (प्रभाग क्र. ०८) यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
आयोजकांनी महागाव शहरातील सर्व पात्र मतदारांना शिबिरात उपस्थित राहून SIR-2026 अंतर्गत आपली नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.