भारत पेट्रोलियमच्या पुढाकारातून स्वच्छतेचा जागर; कल्पतरू विशेष शाळेत विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश, स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रभावी संदेश

लोकवेध न्यूज नेटवर्क / १२ जुलै.

 

 बूटीबोरी /नागपूर :

 

भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष शाळा, बूटीबोरी येथे ‘स्वच्छता पखवाडा’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियमच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वच्छतेवर आधारित चित्रकला स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने स्वच्छ भारत, हरित पर्यावरण आणि स्वच्छ परिसराचे महत्त्व अधोरेखित करणारी आकर्षक चित्रे साकारून उपस्थितांयाची मने जिंकली.

स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रकलेसाठी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. राजेश्वर उत्तरवार, अध्यक्ष श्री. रविंद्र सावजी, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. उपस्थितांनी “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश अंगीकारून स्वच्छ आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने आयोजित ‘स्वच्छता पखवाडा’ उपक्रमात कल्पतरू विशेष शाळेतील विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी होताना तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा क्षण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या