गोदावरी अर्बनचा सामाजिक उपक्रम वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

  महागाव :- २८ मे.

 

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी यांच्या महागाव शाखेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय, महागाव येथे दाखल रुग्णांना फळवाटप करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिनांक २३ मे २०२६ रोजी वर्धापन दिनाचे औचित्य साधून २५ मे रोजी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थापक नामदार मा. हेमंत भाऊ पाटील,अध्यक्षा राजश्री ताई पाटील तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

उप महाव्यवस्थापक सौ. सुरेखा दवे व सहायक महाव्यवस्थापक रवी इंगळे आणि विजय शिर्मेवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

आयोजित या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निमिष धुळधुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत व डॉ. नीलकंठ जाधव, कार्यक्रम सहाय्यक प्रभाकर मोरे तसेच आरोग्य सहाय्यक गोपाल ठाकरे यांची उपस्थिती होती.

यावेळी महागाव शाखेचे शाखा अधिकारी शशांक ढोबळे, सहाय्यक अधिकारी सचिन हिंगडे,जया घड्याळे, रामेश्वर शिंदे,सुयोग साकळे, ओमकुमार भोयर, प्रवीण अढागळे, अमोल रावत यांच्यासह शाखेतील कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या