मानवतेचा संदेश देणाऱ्या संत भिमा भोई यांना हिवरा (संगम) येथे अभिवादन

 लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मे.

 

 हिवरा (संगम)

 

भोई समाजातील महान क्रांतिकारी संत श्री भिमा भोई यांची १७६ वी जयंती हिवरा (संगम) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील संत भिमा भोई चौकात आयोजित कार्यक्रमात संतांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यावेळी उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजुभाऊ धोतरकर, महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा मनविसे तालुका अध्यक्ष महेश कामारकर, आकाश कांबळे, अमोल पाटील कदम, प्रकाश डांगे आणि गजानन पाटील कदम यांच्या हस्ते संत भिमा भोई यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला संजय मोरे, शेख शब्बीर, लक्ष्मणराव सुरोशे, सतीश ठाकरे, बालाजी शिंदे, श्रावण पेवकर, विष्णु पेवकर, विष्णु आगिरकर, ज्ञानेश्वर पेवकर, राम राकडे, बाळू पेवकर, सोनबा आगिरकर, बाळू आगिरकर, लक्ष्मण पेवकर, सुदर्शन मोरे, राहुल मोरे, राहुल पिंपळे, समाधान आगिरकर, दिपक गोंडाडे, परमेश्वर गोंडाडे, सोमेश पिंपळे, अरुण आगिरकर, सौ. लता गजानन पेवकर, कु. सरस्वती पेवकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संत भिमा भोई यांनी समाजाला समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा जयंती उत्सवांचे महत्त्व असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या