मराठा सेवा संघ महागाव तालुक्याच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक सत्र २०२५- २६ मधील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महागाव तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार बुधवार, दिनांक २० मे रोजी सकाळी १० वाजता मातोश्री विद्यालय, महागाव येथे करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री दत्तात्रय कदम साहेब,गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय कांबळे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती महागाव हे राहणार आहेत. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री यशवंत देशमुख सर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन लाभणार आहे.
या गुणगौरव सोहळ्यास तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा सचिव डॉ. संदीप शिंदे, जिल्हा सहसचिव अमोल जगताप, तालुका अध्यक्ष उदय भाऊ नरवाडे, तालुका सचिव पंकज देशमुख, तालुका कार्याध्यक्ष सतीश ठाकरे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल वाघमारे तसेच सर्व मराठा सेवा संघ तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.