दिवट पिंपरी गावाच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आज गाठला गेला असून, १० लाख रुपये खर्चाच्या ओपन सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या सभागृहासाठी लोकप्रिय आमदार श्री. किसनरावजी वानखेडे आणि भाजपाचे जिल्हा नेते श्री. नितीन भुतडा यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
या प्रसंगी गावकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
विशेषतः भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक श्री. नितीन भुतडा यांनी पुढाकार घेत हा निधी मंजूर करून आणल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या सभागृहामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
गावकऱ्यांनीया विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही अशाच सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भाजपचे अकोला जिल्हा प्रभारी नितीनजी भुतडा, आमदार किसनराव वानखेडे,माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.