महागावचा कायापालट ठरला पक्का !” विकासासाठी नितीन भुतडा यांचा निर्धार; घाणेरड्या राजकारणाला पूर्णविराम देणार


⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ फेब्रुवारी
महागाव :
महागाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार करत भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांनी विकासासाठी शहर वासियांना आश्वाशीत केले आहे. “शहरात घाणेरड्या राजकारणाला थारा देणार नाही, शांतता व सुव्यवस्था राखत प्रत्यक्ष कामांच्या जोरावर विकास घडवून आणू,” असा ठाम शब्द त्यांनी महागावकरांना दिला.
महागावकरांना आजपर्यंत खऱ्या अर्थाने विकास पाहायला मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करत भुतडा म्हणाले की, येत्या काळात पाणी, रस्ते, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम केले जाईल. केवळ घोषणा नव्हे तर जमिनीवर कामे दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या माध्यमातून संघटितपणे काम करत महागावला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. शहरात अमूलाग्र बदल घडवून आणत महागावकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भुतडा यांच्या या भूमिकेमुळे महागावच्या राजकारणात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून स्थानिक स्तरावरिल नवे राजकीय पर्व परिवर्तन वादी असणार आहे. त्यामुळे.स्थानिक राजकारण विकासाच्या मुद्द्यावर एकोपा निर्माण करणारे असावे असे सरते शेवटी भुतडा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या