नगर परिषद  उर्दू शाळेत पाकिस्तानी जिहादी गीतांचा सांस्कृत्रिक कार्यक्रमात  धक्कादायक प्रकार ; पोलीसांकडुन  गुन्हा दाखल करण्यात दिरंगाईचा आरोप !

भाजपाने  पत्रकार  परिषदेतून प्रकार उघडकीस आनला
⚫लोकवेध न्युज नेटवर्क / ४ फेब्रुवारी
उमरखेड   –
नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अब्दुल गफूर शाह न.प. उर्दू शाळा क्रमांक २ येथे २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पाकिस्तानशी संबंधित जिहादी स्वरुपाचे गीत गायन व त्यावर नृत्य सादर करुन घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित शिक्षक व शाळा प्रशासनाविरोधात नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी उमरखेड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

“ये मर्द-ए-मुजाहिद, तेरी यलगार क्या है…!” हे गीत पाकिस्तानी माध्यमांशी संबंधित असून १९६५ च्या भारत – पाकिस्तान युद्धकाळात पाकिस्तानकडून नागरिक व सैनिकांना युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी वापरले गेले होते आजही हे गीत पाकिस्तानमध्ये लष्करी व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये गायले जाते.अशा स्वरूपाचे गीत नगर परिषद  सरकारी शाळेत, तेही राष्ट्रीय सांस्कृत्रिक कार्यक्रम  दिवसी , निरागस विद्यार्थ्यांकडून सादर करुन घेण्यात आल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर व देशविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  या गीतामधून उग्र विचारसरणी, तलवार उचलण्यास प्रवृत्त करणारे संदेश तसेच भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे  ही कृती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २८ च्या विरोधात असल्याचा ठपकाही तक्रारीत ठेवण्यात आला आहे.विशेष म्हणजे, या कार्यक्रमावेळी नगरपरिषद पदाधिकारी, नगराध्यक्ष, शिक्षण सभापती व नगरसेवक उपस्थित असतानाही सदर गीत थांबविण्याचा कोणताही प्रयत्न न झाल्याचा आरोप असून, हे मौन अप्रत्यक्ष समर्थनासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे
या प्रकरणी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल कलाने यांनी २ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी, नगरपरिषद उमरखेड तसेच पोलीस स्टेशन उमरखेड येथे तक्रार दाखल करून भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १५२  भारताची एकता व सार्वभौमत्व धोक्यात आणणारी कृत्ये , कलम १९६  सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारी कृत्ये  आणि कलम १९७  राष्ट्रीय हिताविरुद्ध सार्वजनिक कृती  अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत आज  ४ फेब्रुवारी रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह ह्या ठिकाणी  भाजपच्या नगर परिषद  पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली  यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी महेश काळेश्वरकर, नगरपरिषद गटनेते विजय हरपरकर, नगरसेवक गोपाल कलाने, अमोल तीवरंगकर , तसेच युवा पदाधिकारी अतुल खंदारे , पवन मेंढे , लक्ष्मीकांत मैड   उपस्थित होते.

पत्रकार परिषदेतून पोलिस प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला असून, उमरखेड पोलिसांनी न्याय न दिल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे दाद मागण्यात येईल, तसेच तेथेही न्याय न मिळाल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर प्रकरण घेऊन जाण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला
या घटनेमुळे उमरखेड शहरात खळबळ उडाली असून, प्रशासन व पोलीस यंत्रणा पुढील काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या