पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक  संजय देशमुख यांचे हृदयविकाराने निधन

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
माहगाव तालुक्यातील वाकोडी येथील रहिवासी असलेले व पंचायत समिती महागाव येथे कनिष्ठ सहायक म्हणून कार्य बजावणारे संजय बाळासाहेब देशमुख यांचे हृदयविकाराने रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या या निधनामुळे वाकोडी परिसरात एकच शोककळा पसरली आहे

गेल्या काही वर्षा पासून संजय देशमुख हे, महागाव येथील पंचायत समितीच्या कार्यालयात कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे कोणते ही काम ते तात्काळ मार्गी लावत असत. मितभासी म्हणून म्हणून पंचायत समितीमध्ये ते ओळखले जात होते. रविवारच्या मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने  उपचारासाठी पुसद येथील लाईफ लाईन दवाखान्यात नेण्यात आले होते परंतु उपचाराला दाद न दिल्याने त्यांचे यात निधन झाले. या समई त्यांचे वय ५७ वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून मोठा आप्त परिवार आहे वाकोडी येथील समशानभूमीत सोमवार ला एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला राजकीय व्यक्तीसह अनेक प्रतिष्ठित नागरिक व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या