वाकोडी येथे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या क्रुझरचा वेणी फाट्यावर भीषण अपघात; पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव :-

तालुक्यातील वाकोडी येथे अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या क्रुझर वाहनाचा पुसद माहूर मार्गावरील वेणी फाट्यावर अपघात होऊन पाच जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की तालुका वाशिम ,शिरपूर जैन येथील पुरुष आणि काही महिला भगिनी महागाव तालुक्यातील वाकोडी येथे अंत्यसंस्कारासाठी जात असताना पुसद माहूर मार्गावरील वेणी फाट्यावर क्रुझर गाडी क्रमांक एम एच ३७ जी ७३६९ हे भरधाव वेगातील वाहन वळणावर असलेल्या कॅनल मध्ये पलटी झाले. नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत घटनास्थळी कुठलीही जीवितहानी झाली नसून यामध्ये चालकासह पाच प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

 

अपघातानंतर गुंज येथील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेत जखमींना वाहनाबाहेर काढले व खाजगी वाहनांच्या माध्यमातून त्यांना पुसद येथे उपचारासाठी रवाना केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदर क्रुझरमध्ये एकूण बारा प्रवासी होते.दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधला असता, वाहन येण्यास विलंब झाला. त्यामुळे अपघाताच्या गंभीर प्रसंगी आरोग्य यंत्रणेची निष्क्रियता स्पष्टपणे दिसून आल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू आहे.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या