स्व. त्रिवेणी प्रसाद गायकवाड प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संथागार किनवट येथे वृद्धांना अन्नदान व पुस्तक वाटप

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
किनवट :–
स्व. त्रिवेणी प्रसाद गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संथागार, किनवट येथील वृद्धांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. कु. अधिरा प्रसाद गायकवाड हिच्या तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहकार्याने संथागार वृद्धाश्रम (अरुण अळणे) येथील वृद्धांना स्नेहपूर्वक अन्नदान करण्यात आले. तसेच सावित्री बाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटपही करण्यात आले.समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, शिक्षण व संस्कारांची जोड देणारा हा उपक्रम उपस्थितांनी विशेषतः कौतुकास्पद ठरवला. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.यावेळी महागाव येथील जिजामाता बाल संस्कार केंद्राच्या संस्थापक अध्यक्ष सुनीता विभुते तसेच दर्शन फोटो स्टुडिओचे संचालक राज पाटील नरवाडे यांची उपस्थिती होती.
