हिवरा केंद्रांतर्गत शिक्षण परिषद उत्साहात; शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासनावर भर

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव:- 

 

 दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा थार बुद्रुक येथे हिवरा केंद्रांतर्गत शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेस केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेमध्ये हिवरा केंद्राचे केंद्रप्रमुख अनुप पंडित यांनी शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासोबतच प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान, शालेय शिस्त, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा क्र. ३ तसेच इतर प्रशासकीय बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सूर्यकांत नाईकवाडे यांनी मांडले. सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश सूर्यवंशी तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.परिषदेनंतर उपस्थित सर्व शिक्षकांसाठी सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.अतिशय खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात ही शिक्षण परिषद यशस्वीपणे संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या