राजीनामा न दिल्याचा खुलासा; सभापती गुलाबराव जाधवांचा यु-टर्न, राजकीय चर्चांना उधाण

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव : – 

 

महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव लोभा जाधव यांनी काही तासांत राजीनामा देणार असल्याच्या चर्चांवर स्वतः खुलासा करत, आपण राजीनामा सादर केला नसल्याचे लोकवेधशी भ्रमणध्वनीवरून स्पष्ट केले आहे.

सभापती जाधव यांच्याविरोधात २६ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल असून,तो पारित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अविश्वास ठरावापूर्वीच राजीनामा दिला जाईल,अशी जोरदार चर्चा सुरू होती.या पार्श्वभूमीवर जाधव हे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गेल्याची माहिती समोर आली होती.मात्र या संदर्भात बोलताना गुलाबराव जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“मी जिल्हा उपनिबंधकांकडे गेलो होतो, मात्र माझ्या पदाचा राजीनामा सादर केलेला नाही.

या खुलाशानंतर महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून,अविश्वास ठरावाच्या दिवशी नेमके काय घडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.सभापतीने अचानक युटर्न का घेतला असावा याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या