लोकाभिमुख तहसीलदार अभय मस्के यांचा वाढदिवस साजरा; तहसील कार्यालयात वृक्षारोपण

⚫लोकवेवेध न्यूज नेटवर्क
महागाव : –
महागाव तहसीलचे कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख व गोरगरीब जनतेच्या अडचणींना सदैव जाणून घेणारे आदरणीय अभय मस्के (तहसीलदार, महागाव) यांचा वाढदिवस आज साधेपणात व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत परिसरात तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांनी एक व्यक्ती–एक वृक्ष या,संकल्पनेचा आग्रह धरला.
तहसीलदार अभय मस्के यांचे प्रशासकीय कार्य शिस्त,पारदर्शकता व संवेदनशीलतेचा आदर्श मानले जाते.सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत न्याय व विकास यांचा समतोल साधत त्यांनी महागाव तहसीलमध्ये प्रभावी कामकाज केले आहे. गोरगरीब,शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि तत्पर कार्यवाहीमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.या प्रसंगी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी,महिला कर्मचारी तसेच जिवाभावाची पत्रकार मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तहसीलदार अभय मस्के यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
