
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
ऊटी (ता. महागाव):येथे पोलीस व सैन्य भरतीचा मार्ग अधिक सुकर व्हावा आणि गावातील तरुणाईला प्रशिक्षणासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ऊटी ग्रामपंचायतीतर्फे गावात चारशे मीटरचा आधुनिक धावपट्टी ट्रॅक तयार करण्यात आला.या ट्रॅकचे उद्घाटन गट विकास अधिकारी त्र्यंबकराव कदम तसेच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उत्साही तरुण उपस्थित होते.गावाच्या विकासाबरोबरच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.या ट्रॅकच्या माध्यमातून पोलीस भरती, सैन्य भरती व इतर शारीरिक चाचण्यांसाठी गावातील तरुणांना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार असून हा उपक्रम ऊटी गावासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
