उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांमध्ये स्पर्धा; जनशक्तीचा डोअर-टू-डोअर प्रचार लक्षवेधी

उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपसह इतर पक्षांमध्ये स्पर्धा; जनशक्तीचा डोअर-टू-डोअर प्रचार लक्षवेधी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :

 

नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापत असून भाजपसह इतर सर्व प्रमुख पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे. मात्र या सर्वांमध्ये जनशक्तीची घराघरात पोहोचणारी डोअर-टू-डोअर मोहीम विशेष लक्ष वेधून घेत आहे.भाजपच्या भव्य रॅली, कॉर्नर प्रचारसभा मुळे  शहरात शक्तिप्रदर्शनाचे वातावरण निर्माण झाले आहे.जनशक्ती पॅनल, राष्ट्रवादी व शिवसेनेनेही आपल्या परंपरागत मतदारांना सक्रिय करण्यासाठी बैठकांचा आणि संपर्क मोहिमांचा धडाका लावला असून यात एमआयएम सुद्धा प्रभावी असल्याचे दिसून येत आहे.पुढील दोन दिवसात निवडणुकीत आणखी चुरस पाहावयास मिळणार असून काही प्रभागांत स्वतंत्र उमेदवारही समीकरणे बदलत आहेत.

 

जनशक्तीने घराघरात जाऊन मतदारांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, कचरा व्यवस्थापन, नागरिक सुविधा अशा मुद्द्यांवर थेट चर्चा करून मतदारांची मने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आहे.त्यांना आज दुपारी चिन्हका सुमारास वाटप होणार असल्याने नेमके कोणते चिन्ह मिळते याकडे उमरखेड वासियांचे लक्ष वेधले आहे.

 

निवडणुकीत केवळ मोठ्या सभांपेक्षा व्यक्तिगत पातळीवरचा संवाद अधिक प्रभावी ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. उमरखेड मधील नवमतदार आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये या शांत पण प्रभावी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

भाजपच्या संघटित प्रचारयंत्रणेची जोरदार घोडदौड असली तरी, जनशक्तीचा डोअर-टू-डोअर प्रचार अंतिम क्षणी निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे स्थानिक राजकीय वर्तुळांचे अनुमान आहे.सध्या उमरखेडची निवडणूक ही सध्याच्या काळात पंचरंगी आणि चुरशीची लढत होत असून, कोणता पक्ष मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो यावरच अंतिम विजयी समीकरण अवलंबून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या