उमरखेडमध्ये निधी भुतडाची प्रचारात आघाडी; भाजप व आजित पवार गटाचा मजबूत पाठिंबा

लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
सामान्यांच्या न्यायासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे भाजपचे समन्वयक नितिन भुतडा यांच्या सुविद्य पत्नी निधी नितीन भुतडा यांनी उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली आहे.त्या,उच्चशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून मतदारांमध्ये वेधक ठरत आहेत.
उमरखेडमध्ये सध्या प्रचाराला जोरदार वेग आला असून निधी भुतडा यांनी पहिल्याच टप्प्यात आघाडी घेतली आहे. विविध प्रभागांमध्ये संवाद, भेटीगाठी आणि घरदार संपर्कातून प्रचार मोहीम व्यापक पातळीवर राबविली जात आहे.प्रचाराला विद्यमान आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे यांसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांचे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी आहेत. संयुक्त शक्तीमुळे उमरखेडमध्ये राजकीय समीकरणांना नव्या दिशा मिळत असून प्रचार रंगतदार बनला आहे.निधी भुतडा यांच्या उमेदवारीमुळे शिक्षण, महिला नेतृत्व आणि विकासाभिमुखतेचा नवा पर्याय मतदारांसमोर उभा राहिल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटत आहे.
