तेजश्री जैन यांच्या प्रचाराची विजयी धडाकेबाज सुरुवात जैन परिवारावरील जनतेचा अढळ विश्वास उफाळून आला

उमरखेडच्या भावनांना स्पर्श करणारी उमेदवार!
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
ज्ञानेश्वर ठाकरे
उमरखेड :
उमरखेडकरांच्या मनात वर्षानुवर्षे साठलेली अपेक्षा, विकासाची आस आणि बदलाची हाक या साऱ्यांना प्रतिसाद देत तेजश्री जैन नगराध्यक्ष पदासाठी जनशक्ती आघाडीकडून रिंगणात उतरल्या आणि त्याच क्षणी शहराचे राजकारण नव्या दिशेने वळाले.सोमवारच्या शुभ मुहूर्तावर उमरखेड नगरपरिषदेजवळील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची दमदार सुरुवात केली तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश दिसत होता. कारण उमरखेडकरांना जैन कुटुंबाचा लोकाभिमुख इतिहास माहित असून यांचेवर दृढ विश्वासही आहे.
⬛ संतोष जैन असतील तर न्याय मिळतो
याच भावनेतून तेजश्री जैन पुढे लोकांच्या प्रेमाचा ओघ प्रचंड
उमरखेड मधील सर्वसामान्य माणसाचे सूख दु:ख, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरीबांचे अन्याय या, साऱ्यांसाठी वर्षानुवर्षे वकील संतोष जैन उभे राहिले.कोणतीही अपेक्षा नाही, परतावा नाही फक्त लोकांची बाजू लढवण्याची वृत्ती दिसून आली.हाच सेवाभाव उमरखेडकरांच्या मनात इतका खोल रुजला आहे की आज त्यांची अर्धांगिनी तेजश्री जैन प्रचाराला निघाल्या, आणि नागरिकांनी त्या आपल्याच घरातील उमेदवार असल्याचा भाव म्हणून त्यांना उचलून धरले.नगरातील महिलांपासून युवकांपर्यंत, ज्येष्ठांपासून व्यावसायिकांपर्यंत प्रत्येक गटात एकच भावना उमटते ज्यांनी आम्हाला दिलासा दिला त्यांनाच शहराची जबाबदारी द्यावी असा अजेंडा सुद्धा राबवित असल्याचे प्रामुख्याने दिसून आले.
————————————————
⬛ सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज आता लाट बनली
⬛ तेजश्री जैन यांच्यात दिसतो बदलाचा चेहरा
अपूर्ण कामांची आस,वाढलेली दंडेलशाही , जीवनाचे प्रमुख साधन असलेल्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी, दुर्लक्षित रस्ते, आणि नागरिकांची वाढती नाराजी या सर्वामुळे उमरखेडमध्ये परिवर्तनाची मागणी प्रखर होत आहे.या,नाराजीचे रूपांतर आता स्पष्ट जनसमर्थनात झाल्याची एकदारित्यस्थिती निर्माण झाली आहे.
⬛ प्रचाराच्या सुरुवातीपासूनच नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले
यावेळी बदल हवा आणि बदल म्हणजे तेजश्री जैन!
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद इतका जबरदस्त होता की प्रभागानंतर प्रभाग लोक स्वतः पुढे येऊन जैन यांच्यासाठी प्रचार करताना दिसले.
महिलांसाठी संवेदनशील, तरुणांसाठी संधी,आणि शहरासाठी भक्कम विकास आराखडा तयार
तेजश्री जैन यांची मोहिम उमेदवारीपेक्षा उमरखेडचा संकल्प’ वाटतो आहे.त्यांच्या मुख्य मुद्द्यांमध्ये सर्वसमावेशक व पारदर्शक प्रशासन प्रत्येक प्रभागाला समान न्याय महिलांसाठी स्वावलंबन कार्यक्रम तरुणांसाठी कौशल्य व रोजगाराभिमुख उपक्रम, तसेच शहराचे आधुनिकीकरण व सोयी सुविधांची वाढ,स्वच्छ, सुरक्षित, आणि नियोजनबद्ध उमरखेड ही,मुद्दे सांगतानाच नागरिक स्पष्ट म्हणतात :हे आश्वासन नाही… हे उमरखेडच्या भविष्यासाठी दिलेले वचन आहे.हनुमान मंदिरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज सर्वत्र उत्साहाने स्वागत होणारा झाला आहे. प्रभागातून प्रभागात फिरताना महिलांची, तरुणांची, व्यावसायिकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची ऊर्जित प्रतिक्रिया पाहता जणू संपूर्ण शहर परिवर्तनासाठी एकवटले असल्याचे चित्र दिसत आहे.
