उमरखेड नगरपरिषदेत मुकाबला चुरशीचा अध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी १३२ उमेदवार रिंगणात

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड

 

उमरखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी आज नामांकन मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडताच अधिकृत प्रतिस्पर्ध्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार, तर १३ प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी तब्बल १३२ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.

 

नगराध्यक्ष पदासाठी एकूण २३ अर्ज दाखल झाले होते. छाननीत ७ अर्ज बाद झाले. त्यानंतर आज शेवटच्या दिवशी ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेर ५ उमेदवारांची चुरस निर्माण झाली आहे.नगरसेवक पदासाठी १३ प्रभागांत २२६ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत ६४ अर्ज बाद झाले. आज अखेर २५ उमेदवारांनी माघार घेतली असून शेवटी १३२ अर्ज कायम आहेत.निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद निवडणूक कक्षात नियमबद्ध पूर्ण केली.उमरखेडकरांच्या अपेक्षांना कोण प्रतिसाद देईल, कोणाच्या हातात सत्तेची धुरा जाणारयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या