महागावची आधुनिक शेतीची नवी दिशा

महागावची आधुनिक शेतीची नवी दिशा
सौ. जयश्री संजय नरवाडे यांची ४०० नारळ झाडांची बाग टिकाऊ व दीर्घकालीन उत्पन्नाचे आदर्श मॉडेल
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
बदलते हवामान, सतत कमी पडणारी मजूर उपलब्धता आणि पारंपारिक पिकातील अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी अडचणीत असताना महागाव येथील सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी आधुनिक नारळ शेतीचा पर्याय निवडत तालुक्यात नवे दालन उघडले आहे. शहरापासून अवघ्या एका किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या शेतात २.५ एकरांत ४०० नारळ झाडांची बाग उभी राहिली आहे. आणखी ४ एकर जागेवर विस्ताराचा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला आहे.
हा नारळ बाग संपूर्णपणे ठिबक सिंचनावर आधारित आहे.पाण्याचा मर्यादित वापर, झाडांची वेगवान वाढ आणि अचूक खत व्यवस्थापन यामुळे ही पद्धत अत्यंत यशस्वी ठरली असून याचा लागवड खर्च एकरी २ लाख रुपये आल्याचे नरवाडे यांनी बोलतांना सांगितले.यामध्ये देखभाल खर्च कमी आणि व्यवस्थापन सोपे असल्याचे पुढे बोलतांना म्हणाल्या.
⬛
नारळ शेतीची दीर्घकालीन क्षमता
नारळ झाडे चौथ्या वर्षापासून उत्पादन देतात. नरवाडे यांच्या बागेला दोन वर्षे पूर्ण झाली असून आणखी दोन वर्षांत उत्पादन सुरू होणार आहे.एका झाडाचे वार्षिक उत्पन्न सुमारे १०,००० रुपये एकूण उत्पादनक्षम झाडे सुमारे ३०० असून याचे सरासरी उत्पादन तीस लाख रुपये एवढे होईल अशी,यावेळी सौ.जयश्री नरवाडे यांचे पती संजय नरवाडे यांनी अपेक्षा व्यक्त केली.आरोग्यदायी पेय म्हणून नारळपाण्याची वाढती मागणी बाजारपेठ सुरक्षित ठेवत आहे. स्थानिक तसेच शहरांमधील बाजारपेठेत सहज विक्री उपलब्ध असल्याने आर्थिक स्थैर्याची खात्री मिळते.आधुनिक, शाश्वत आणि कमी जोखमीची शेती म्हणून नारळ शेतीकडे पाहिले जाते.पारंपारिक पिकांच्या तुलनेत कमी श्रम, कमी जोखीम आणि दीर्घकाळ टिकणारे स्थिर उत्पन्न यामुळे नारळ शेती हा उत्तम पर्याय ठरतो. सौ. नरवाडे यांचा हा उपक्रम भविष्यातील शाश्वत शेतीचे मॉडेल म्हणून पाहि
ले जात आहे.

