विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप; सरपंच निशा राठोड जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यास सज्ज

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

 

महागाव :

महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथील प्रगतीशील आणि जनसंपर्कात आघाडीवर असलेल्या सरपंच निशा संतोष राठोड यांनी आपल्या गावातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची मार्गदर्शक पुस्तके वाटप करून महत्वाची सामाजिक बांधिलकी पार पाडली. समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा म्हणजे भविष्य बदलण्याची संधी आणि हीच संधी बळकट करण्यासाठी राठोड यांनी पुढाकार घेतल्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख म्हणून संतोष राठोड हे तालुका परिसरात कार्यरत आहेत.या कार्यक्रमाला प्रामुख्याने त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सरपंच राठोड म्हणाल्या की,स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने यश मिळवावे, आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका निर्माण केली आहे.ग्रामीण भागातून आय.ए. एस.आय.पी.एस. अधिकारी घडावे हीच माझी इच्छा.माझ्या परीने प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या

 

ग्रामविकासात सक्रिय, महिलांच्या प्रश्नांसाठी धडपडणाऱ्या आणि गावकुसापासून तालुक्यापर्यंत मजबूत संपर्क जाळे असलेल्या निशा राठोड आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.त्यांना आपल्या आपले वडील, महागाव पंचायत समितीचे माजी सभापती शेषराव पवार यांचेकडून राजकीय वारसा असून त्यांच्या अलीकडच्या उपक्रमांना पुस्तक वाटप, शैक्षणिक मदत, ग्रामविकास कामांचा धडाका यांना पाहूनच त्यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेची झलक स्पष्ट दिसत आहे.

 

गाव विकास, शिक्षण आणि महिलांच्या सबलीकरणावर लक्ष केंद्रित करून लोकाभिमुख नेतृत्व देणारी राठोड जिल्हा परिषदेत प्रभावी पर्याय ठरतील, अशी चर्चा सध्या राजकीय पटलावर जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या