महागाव शहरात मतदार यादीत बोगस नावांची भरती नगराध्यक्ष कोण निवडणार बाहेरगावचे मतदार की गावातील सुज्ञ नागरिक ?

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
- महागाव :-
आगामी काळातील नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाव शहरातील मतदार यादीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची भरती झाल्याचे आकडे सामोरे येतांना दिसत असून निवडणूक लढविणाऱ्या काही इच्छुक महाभागाने सदर मतदान यादीत आपल्या नातेवाईक व हितचिंतकाची संबंधित बीएलओ कडून नावे वाढविली असल्याचा माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे यांनी लोकवेध ला दिलेल्या मुलाखती आरोप केला आहे.तसेच परराज्यात, इतर शहरांत कायमस्वरूपी राहत असलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आढळत आहे.त्यामुळे या संदर्भात प्रशासनाकडून सदर मतदाराची शहानिशा करण्याची गरज आहे.
महागावचा नगराध्यक्ष कोण ठरवणार ? गावातील सुज्ञ नागरिक… की बाहेरगावाहून आणलेले बोगस मतदार ?
निवडणुकीच्या अगोदरच मतदार यादीतील ही संशयास्पद वाढ लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात मानली जात आहे. नागरिक प्रशासनाकडे पारदर्शक चौकशीची मागणी करीत असून, निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.मतदार यादीत झालेला हा अतिरिक्त पुरवठा निवडणुकीला वळण देणारा ठरणार आहे.त्यामुळे महागावचा नगराध्यक्ष कोण ठरवणार ? गावातील सुज्ञ नागरी की बाहेर जाऊन आणलेले बोगस मतदार असा ही सवाल उदय नरवाडे यांनी उपस्थित केला आहे.
