उमरखेड जनशक्ती पॅनलकडून नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री जैन यांचे पॅनल समर्थकांसह नामांकन दाखल 

 

  ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :

नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमरखेड शहरात राजकीय वातावरण तापलेले दिसले. या पार्श्वभूमीवर उमरखेड जनशक्ती पॅनलकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार तेजश्री संतोष जैन यांनी आपल्या २६ समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्या कक्षात नामांकन दाखल केले.

 

नामांकन दाखल करताना जनशक्ती पॅनलचे प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांची भक्कम उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये नंदकिशोर अग्रवाल, साहेबराव कांबळे, ईनायतुल्ला जनाब, राम देवसरकर, गोपाल अग्रवाल, साजिद जागीरदार, अॅड. बाळासाहेब नाईक, अॅड. संतोष जैन, बळीराम मुटकुळे, सुभाष दिवेकर, अॅड. संजय शिंदे, सतीश नाईक यांच्यासह पॅनलमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या