उमरखेडमध्ये भाजपचा दमदार प्रचार शुभारंभ; 

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड : – नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज महात्मा बसवेश्वर मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली. भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधी भूतडा तसेच प्रभाग ११ चे उमेदवार प्रकाश दुधेवार व संतोषी संतोष हिंगमिरे यांच्यासह शहरातील सर्व भाजप उमेदवारांनी मोठ्या उत्साहात प्रचाराची गुढी उंचावली 

 

या कार्यक्रमाला भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भूतडा, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार विजय खडसे, तसेच भाजप पदाधिकारी, मित्रपक्ष नेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी वार्ड प्रभाग ११ मधील मतदार बंधू-भगिनींची लक्षणीय उपस्थिती विशेष ठरली.

प्रचार शुभारंभादरम्यान आगामी निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व भाजप उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील विविध मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी आपला प्रचार प्रारंभ केला असून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या सहभागाने ताकद दाखवली.

 

भाजपने शहरात भव्य शक्ती प्रदर्शन करत चौकाचौकात फटाके, बँड पथक, बंजारा डफडे पथकासह रॅली काढली. या रॅलीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले आणि निवडणुकीच्या वातावरणात उत्साहाची नवी लहर निर्माण झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या