३५ वर्षांनंतर दहावीच्या मित्रांचा भावनिक मिलाप; माहूर येथे जुन्या आठवणींना उजाळा

 लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ जून.

 

माहूर :-

 

 दहावी १९८५ बॅचच्या वर्गमित्रांनी तब्बल ३० ते ३५ वर्षांनंतर एकत्र येत माहूर येथील दत्त शिखर संस्थानात भावनिक मिलाप साधला. या प्रसंगी संस्थानाचे महंत (मालक) प.पू. डॉ. धनेश्वर भारती (श्याम महाराज भारती) यांचे दर्शन घेत मित्रांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

दि. ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात अनेक वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्याने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शालेय जीवनातील आठवणी, त्यानंतरच्या आयुष्यातील अनुभव तसेच सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर चर्चा करत सर्वांनी जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

 

यावेळी प.पू. डॉ. धनेश्वर भारती यांनीही मित्रांशी संवाद साधत जीवनातील सकारात्मकता, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या सान्निध्यात घालवलेला वेळ सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

 

सर्व मित्रांची अनेक वर्षांनंतर झालेली ही भेट भावनिक आणि आनंददायी ठरली. याच उत्साहातून पुढील वर्षी कुटुंबियांसह पुन्हा भेटण्याचे नियोजनही करण्यात आले.

 

दरम्यान, या स्नेहमेळाव्यासाठी सर्व मित्रांना एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मित्र श्री दादाराव सूर्यवंशी यांच्या धडपडीला अखेर यश आले. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून न भेटलेल्या मित्रांचे पुनर्मिलन घडून आले असून, या संस्मरणीय भेटीमुळे सर्वांनी मनापासून आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या