पुसदमधील जेट किड्स इंटरनॅशनल शाळेत निष्काळजीपणा विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला.दहावीतील विद्यार्थ्याला शाळेतच गंभीर दुखापत ! संस्था चालकांची चुप्पी 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :- 

पुसद शहरातील जेट किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमधील निष्काळजीपणामुळे दहावीमध्ये शिकणारा अमेय महेश खंदारे एक्स्ट्रा क्लासदरम्यान

 खेळताना गंभीर जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेळताना तो खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि नागपूर येथे मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये शरीरातील एक महत्त्वाचा अवयव काढावा लागला असून त्याचे आयुष्यभरासाठी शारीरिक नुकसान झाले आहे.

 

या घटनेदरम्यान मैदानावर शिक्षक किंवा सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते. दिवाळीच्या सुट्टीत एक्स्ट्रा क्लाससाठी विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले मात्र कोणताही क्लास न घेता विद्यार्थ्यांना मैदानात बसवण्यात आले,असा, महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रहिवासी मनीष खंदारे या पालकांचा आरोप आहे.या घटनेनंतर शाळा प्रशासनाने मुलाच्या उपचाराविषयी कोणतीही आर्थिक मदत केली नाही किंवा विचारपूसही केली नसल्याचे महागाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पालकांनी सांगितले. 

 

या संदर्भात संतप्त पालकांनी शाळेच्या संचालक, मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांविरोधात पुसद शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.यासंदर्भात पालकांनी महागाव येथे पत्रकार परिषद घेऊन शिक्षण विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला.शाळेत सीसीटीव्ही,सुरक्षा रक्षक, अग्निशमन यंत्रणा,निरीक्षण व्यवस्था नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खाजगी शाळांचा निष्काळजी कारभार,विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने या प्रकरणात योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,जनभावना आहे.

 

बॉक्स:

 

  • शाळेच्या प्रेडच्या वेळात सदर विद्यार्थी शाळेतील प्रांगणात खेळत असताना घटना घडली.यात आम्ही सदर विद्यार्थ्याला उपचारासाठी आमच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचेवर आम्ही योग्य ते उपचार केले.असे अमोल मालपाणी,पुसद येथील जेट किड्स विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष,यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेधशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या