पैनगंगा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन;  स्थानिक गुन्हे शाखेची धडककार्यवाही ,चार ट्रॅक्टर  जप्त महसूल प्रशासनावर प्रश्न चिन्ह 

 

लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

महागाव :- 

 

पैनगंगा नदीपात्रात दररोज राजसोज पणे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महागाव महसूल विभाग चांगलाच मेहेरबान असल्याचे आज दिनांक ५ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीत उघड केले आहे.अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ५ डिसेंबर रोजी फुलसावंगी परिसरात छापा सत्र सुरू केले. दरम्यान या कारवाईत परवानगीविना रेती उत्खनन व वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून १६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

 

या,प्रकरणात अमोल शामराव नखाते (फुलसावंगी), संदीप यादव राहटे (चिंचोली), गजानन बापूराव आवळे (हिंगणी, माहूर), अक्षय गणेश इंगोले (हडसनी, माहूर) यांच्यावर कलम ३७९ भादंवि आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४८(८) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धिरज बांडे, प.उ.नि. शरद लोहकरे, स.फौ.मुन्ना आडे,पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव,पोहवा कुणाल मुंडोकर,पोहवा रमेश राठोड,पो.शी. सुनील पंडागळे,चा.पो.उपनि. रवींद्र शिराणे आणि चा.पो.शी. राजेश जाधव यांनी ही कारवाई केली.

 

  • उमरखेड मध्ये कधी कार्यवाही 
  • याच धर्तीवर उमरखेड तालुक्यात अवैध्य रेती, वरळी मटका, जुगार अड्डे या सर्व अवैध्य धंद्यांना पोलिस प्रशासनाने मूकसंमती दिल्याचे सुरू असलेल्या या धंद्यावरून लक्षात येते. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर आता शंका निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या