उमरखेडमध्ये जनशक्तीची ‘बस’ आघाडीच्या रेषेत? तेजश्री जैन यांच्या प्रचाराला महिलांचा मोठा प्रतिसाद

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनशक्तीच्या ‘बस’ प्रतीकाचा प्रचार वेग घेत असून स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून तेजश्री जैन यांच्या प्रचार मोहिमेला विशेषतः महिलांकडून आणि तरुणांकडून मिळणारा पाठिंबा वाढत चालल्याचे दिसत आहे. घराघरातील भेटीगाठी आणि स्थानिक समस्या यावर थेट संवाद साधण्याच्या धोरणामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.
शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि नागरी सुविधांबाबत उपाययोजनांची ग्वाही देत तेजश्री जैन यांनी प्रचाराला सुरुवातीपासून गती दिली आहे. अनेक वॉर्डांमध्ये झालेल्या सभांना महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त दिसून आला. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांचा कल निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय स्तरावरून व्यक्त होत आहे.

जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ आणि वॉर्डस्तरावर जाळे मजबूत करण्यासाठी जनसंपर्क मोहिमेला जोर दिला आहे. स्थानिक स्तरावरील प्रश्नांवर थेट बोलत प्रचार मोहीम पुढे नेण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘बस’चे चक्र आणखी वेग घेत असल्याचे गणित राजकीय वर्तुळात मांडले जात आहे.नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत तेजश्री संतोष जैन यांचे नाव चर्चेत असून आगामी काही दिवसांत प्रचार आणखी रंगत जाण्याची शक्यता आहे. यामुळे उमरखेडची निवडणूक अधिक रोचक व चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या