उमरखेडमध्ये गुन्हेगारीवर पोलिसांचा करारा प्रहार रितेश ऊर्फ राजू शिंमले तडीपार; तीन जिल्ह्यांतून हकालपट्टी

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :

 

उमरखेड तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत कुख्यात गुन्हेगार राजरतन ऊर्फ ‘चिंट्या’ बापूराव शिंमले (रा. विडुळ, ता. उमरखेड) याला तडीपार केले आहे. चोरी, दरोडे, मारहाण, गंभीर दुखापत, गुन्हेगारी टोळ्या तयार करणे तसेच अवैध दारू आणि मादक पदार्थ विक्री अशा अनेक गुन्ह्यात त्याचा सतत सहभाग असल्याची नोंद पोलिसांकडे होती. वारंवार चेतावणी आणि कारवाईनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने प्रशासनाने कठोर निर्णय घेतला.

 

पोलिसांनी शिंमलेविरुद्ध तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार २४ नोव्हेंबर २०२५ रोजी उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांनी शिंमलेला एक वर्षासाठी यवतमाळसह शेजारील जिल्ह्यांच्या हद्दीतून हाकलून देण्याचे आदेश दिले.या,आदेशानुसार पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने शिंमलेला जिल्ह्याबाहेर सोडले. या कारवाईत पो.उपनिरीक्षक सागर इंगळे, पो.ह/कॉ. दिलीप चव्हाण, पो.ह/कॉ. मयूर पवार, पो.ह/कॉ. नितेश लोंढे आणि टेमके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोलिसांची ही कारवाई उमरखेड तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत पोलिस प्रशासनाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या