उमरखेड सुवर्णकार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : बालिकेच्या हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीवर जलदगती न्यायालयात शिघ्र खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संत नरहरी महाराज सुवर्णकार संघटनेतर्फे करण्यात आली. यासाठीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
डोंगराळे येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार व हत्येच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अशा विकृत प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी निष्पक्ष चौकशी करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच शासनाने या घटनेची गंभीर दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष सुनिल टाक, सचिव राम बोकन, कोषाध्यक्ष कैलास उदावंत, सतीश श्रीरामजवार, सुनिल उदावंत, देवीदास शहाणे, अतुल मैड, नितीन शहाणे, वैभव उदावंत, सावन टाक, अतुल पत्तेवार, शंकरराव काळे, तुषार कदम, यश उदावंत, गजानन नाशिककर, प्रसाद महामुने, संजय डहाळे, दिपक वाकडे, दिलीप शहाणे, निळकंठ धोबे, सुरज कुलथे, अनिल नाशिककर यांच्यासह शेकडो सुवर्णकार समाजबांधव उपस्थित होते.
नायब तहसीलदार सुभाष पाईकराव यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारले.
