उमरखेड वनपरिक्षेतून अवैध उत्खनन, वनअधिकारी मुग गिळून गप्प ! 

 

उमरखेड वनपरिक्षेतून अवैध उत्खनन, वनअधिकारी मुग गिळून गप्प ! 

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :

 

उमरखेड वनपरिक्षेत्रात चिल्ली गावालगत वनविभागाच्या खदानीतून दररोज टिप्पर द्वारे गौण खनिजाची अवैध वाहतूक होत आहे.त्यामुळे उमरखेड वनपरिक्षेत्र विभागाने यांना अवैध्य गौण खनिज चोरटी वाहतूक करण्याची मूकसंमती दिली की ? काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 परवानगीशिवाय होत असलेला खनिजाचा मोठ्या प्रमाणातील उपसा, जड यंत्रसामग्रींचा उघडपणे वापर आणि दिवसाढवळ्या सुरू असलेली वाहतूक या प्रकाराला समर्थन देणारी ठरत असून हे, संशयाला आमंत्रण देत आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या मते, उत्खननाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जंगल परिसरातील पर्यावरण, वनसंपदा आणि प्राणीजीवन धोक्यात येत आहे. ठेकेदारांनी उघडपणे नियमांची पायमल्ली करताना दिसत असताना, जबाबदार अधिकाऱ्यांची अनाकलनीय शांतता हा सर्वात मोठा प्रश्न ठरत आहे. काही स्थानिकांनी या संपूर्ण व्यवहारात मूक संमती असल्याचा आरोपही केला आहे.

 

वनपरिक्षेत्रात अशी बेकायदेशीर कामे सुरू असताना शांत राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. संबंधित उत्खनन तातडीने थांबवून चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करीत आहेत.

 

सरकार पर्यावरण संवर्धनाच्या मोठमोठ्या घोषणा करते, परंतु जमिनीवर मात्र वेगळीच परिस्थिती दिसत असल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उमरखेड वनपरिक्षेत्रातील हे अवैध उत्खनन थांबणार की अधिकारी यावर अजूनही गप्पच बसणार? याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

________________________________________________

⬛ वरील विषया संदर्भात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या