उमरखेडमध्ये कमरेला खंजीर बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :-
१७ नोव्हेंबर — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने उमरखेड येथे एका तरुणाकडून धारदार खंजीर जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, उमरखेड–ढाणकी रोडवरील नागपूर–तुळजापूर हायवे ब्रिज परिसरात २२ वर्षीय शेख मुजम्मील शेख रमजानी (रा. मृतृजानगर, उमरखेड) हा कमरेला मोठ्या आकाराचा लोखंडी खंजीर घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पंचांसमोर घेतलेल्या झडतीत काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेला, अंदाजे ₹ २००० किमतीचा धारदार खंजीर आढळून आला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धीरज बांडे व पथकाने केली. या कारवाईत सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव (स्थानिक गुन्हे शाखा – यवतमाळ) यांनी सहभाग नोंदविला
