उमरखेडमध्ये डीजे पूर्णतः बंद पोलीस विभागाचा कडक इशारा 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

उमरखेड : – शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनने डीजे वाजविण्यावर संपूर्ण बंदी लागू केली आहे. याबाबत मा. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या निर्देशानुसार पोलीस स्टेशनने अधिकृत प्रेस नोट जारी करून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

शहरात विविध सण, उत्सव, जयंती मिरवणुका, विवाह, ईद-ए-मिलाद व रामनवमी यावेळी डीजेमुळे अनेकदा तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी अशाच कारणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हे नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात डीजे वाहन उभे राहिल्याने आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेचे वेळेत पोहोचणे कठीण जात असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय पक्ष व नागरिकांनीही डीजेला विरोध दर्शवून आरोग्य व स्वास्थाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे निवेदन दिले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर उमरखेड शहर व परिसरात डीजे वाजविण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही सण-उत्सव, जयंती, मिरवणूक किंवा कार्यक्रमासाठी डीजे बुक करणे अथवा वाजविणे कायदेशीर गुन्हा ठरेल. डीजे लावल्यास आयोजक आणि डीजे चालक/मालकाविरोधात प्रचलित कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी दिला आहे.

पोलिसांनी जाहीर केलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी याची गंभीर नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या