कार्यालय वाऱ्यावर,विश्रामगृहात व्यवहार ? पुसद बांधकाम विभागात ‘मार्च एंडिंग’चा संशयास्पद कारभार!”

 

जिल्हा परिषद बांधकाम विभाग( २)चे पुसद येथील कार्यालय..

लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ मार्च 

 

 पुसद :- 

 

पुसद येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक २ मधील उपअभियंता सतीश नांदगावकर यांच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अधिकृत कार्यालय सोडून पुसद येथील विश्रामगृहावरूनच कामकाज सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित जिल्हा परिषदेचा उपअभियंता सतीश नांदगावकर हे अधिकृत कार्यालयात अनुपस्थित असून, “साहेब सुट्टीवर आहेत” असे कारण चेलेचपाट्यांकडून दिले जात आहे.मात्र दुसरीकडे,विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक २ मध्ये विविध शासकीय विकासकामाची बिल काढणाऱ्या ठेकेदारांच्या रांगा लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, सध्या मार्च एंडिंगचा कालावधी सुरू असल्याने बिले काढण्याचा जोर वाढला आहे.पुसद आणि महागाव या दोन्ही ठिकाणी कोट्यवधी रुपयांची विकासकामे झालेली असून,त्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदारांकडून मोठा आटापिटा सुरू असल्याचे समजते.

याच पार्श्वभूमीवर,अधिकृत कार्यालयाऐवजी विश्रामगृहातून कामकाज सुरू असल्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शासनाने बहाल केलेले कार्यालय बाजूला ठेवून अनधिकृतपने शासकीय कामकाज सुरू असून या, ठिकाणी गैर व्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे. सकाळी दहा वाजपासून त्यांचे तयार असलेले जेवण दुपार पर्यंत प्रतीक्षेत दिसून आले. त्यामुळे आदरणीय साहेब किती कामाचे आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

दरम्यान, या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी जनभावना आहे.

खोली नंबर दोन,दरवाज्यात असलेली ही, पायटणे..
प्रतीक्षेत असलेले जेवण…

वरील विषया संदर्भात लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल,लोकवेध ने,प्रत्यक्षदर्शी पाहणी केली असता वरील प्रकार स्पष्ट पने दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या