स्थायी समितीच्या नेतृत्वाची धुरा वीरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या खांद्यावर; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ मार्च 

नांदेड : – 

 

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी वीरेंद्रसिंग गाडीवाले यांची नियुक्ती झाल्याने शहराच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महापालिकेच्या विकासकामांना गती देण्यासाठी स्थायी समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.या पार्श्वभूमीवर गाडीवाले यांच्याकडे जबाबदारीची धुरा सोपविण्यात आली असून,त्यांच्या नेतृत्वात शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गाडीवाले यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे पारदर्शकता, विकासाभिमुख निर्णय आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सहकारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या