वर्तन समस्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; पालक-शाळा समन्वयातून विद्यार्थ्यांच्या विकासाला नवी दिशा

लोकवेध न्यूज नेटवर्क / २१ मार्च
नागपूर :
बूटीबोरी येथील कल्पतरू विशेष शाळेत २१ मार्च २०३६ रोजी विद्यार्थ्यांच्या वर्तन समस्या (Behaviour Problems) या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. प्रबोध एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. प्रबोध सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्या
कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या वर्तनातील विविध समस्या ओळखण्याच्या पद्धती, त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास आणि त्यावर प्रभावी व व्यवहार्य उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सकारात्मक प्रोत्साहन (Positive Reinforcement) या तत्त्वाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक व दीर्घकालीन बदल कसा घडवून आणता येतो,यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान पालकांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून तज्ज्ञांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सावजी, सचिव डॉ. आर. एम. उत्तरवार, सौ. गौरी उत्तरवार मॅडम, सौ. गौरी देशपांडे मॅडम तसेच शाळेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
