७ वर्षांच्या रूहानची अटळ जिद्द ! कडक उन्हात पूर्ण केला आयुष्यातील पहिला रोजा 

लोकवेध न्यूज नेटवर्क / १९ मार्च 

महागाव :- 

 

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना अंतिम टप्प्यात पोहोचला असताना,‘शब-ए-कद्र’च्या पार्श्वभूमीवर महागाव येथील एका चिमुकल्याने आपल्या श्रद्धा आणि जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.अवघ्या सात वर्षांच्या रूहान सोयब पारेख याने कडक उन्हाची पर्वा न करता आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

रमजान महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाण्याविना राहणे हे मोठ्यांसाठीही आव्हानात्मक असते. मात्र,लहानग्या रूहानने आपल्या कुटुंबीयांकडून प्रेरणा घेत स्वतःहून रोजा ठेवण्याचा निर्धार केला. त्याचे वय लक्षात घेता पालकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला,तरीही त्याच्या जिद्दीपुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.पहाटे ‘सहरी’करून रूहानने आपल्या पहिल्या रोजाची सुरुवात केली.दिवसभर खेळाची ओढ असूनही त्याने संयम आणि शिस्त कायम राखत उपवास पूर्ण केला.सायंकाळी ‘इफ्तार’च्या वेळी त्याने आपला पहिला रोजा सोडला.या,खास क्षणी त्याचे वडील सोयब पारेख आणि कुटुंबीयांनी फुलांचा हार घालून व मिठाई भरवून त्याचे कौतुक केले.एवढ्या लहान वयात दाखवलेली ही,निष्ठा आणि चिकाटी पाहून परिसरातून रूहानवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रूहानची ही प्रेरणादायी कथा केवळ श्रद्धेचीच नाही,तर लहान वयातही मोठी जिद्द आणि आत्मसंयम काय असतो, याचे सुंदर उदाहरण ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या