पी.के.व्ही. अकोलाचे माजी वित्त अधिकारी शंकरराव (एस. के.) कदम यांचे निधन

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मार्च
महागाव : –
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील सेवानिवृत्त वित्त अधिकारी तथा एस. के. साहेब म्हणून सर्वत्र परिचित असलेले हिवरा (संगम) येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शंकरराव कोंडबाराव कदम यांचे ११ मार्च २०२६ रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शंकरराव कदम हे कर्तव्यनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि आध्यात्मिक विचारांचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. विविध सामाजिक व धार्मिक विषयांवर ते प्रवचन व व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असत. तसेच ते एकविरा देवी संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
शासकीय सेवेत असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम करत अनेकांची मने जिंकली. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक,धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग ठेवत समाजाशी घट्ट नाळ जपली होती.
त्यांचा अंत्यविधी १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १२.३० वाजता हिवरा (संगम) येथील मोक्षधाम येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा परिवार असून त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
