नालीतील कचरा आठवडाभर रस्त्यावरच; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ फेब्रुवारी 

महागाव :- 

महागाव : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नाली साफसफाईदरम्यान उपसलेला कचरा मागील आठवडाभरापासून रस्त्याच्या कडेला पडून असून संबंधित यंत्रणेकडून त्याची अद्यापही उचल करण्यात आलेली नाही.त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला अवगत करण्यात आले असताना याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.दरम्यान काल झालेल्या पावसामुळे कचऱ्यातून दुर्गंधी अधिक वाढली असून डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी तातडीने कचरा उचलून स्वच्छता करण्याची मागणी केली असून संबंधित नगरपर पंचायत घनकचरा विभागाने त्वरित लक्ष घालावे,अशी जनभावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या