कमी दरात गाळे, कायद्यानुसार देयके; तोट्यापासून बचावासाठी प्रक्रिया थांबवली ;जीनिंग संस्थेचा पत्रकार परिषदेत खुलासा 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड : –
सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जीनिंग अँड प्रेसिंग संस्थेविरुद्ध करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा ठाम दावा करत संस्थेने पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली. सर्व निर्णय संचालक मंडळाच्या ठरावानुसार, कायदेशीर व पारदर्शक पद्धतीनेच घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१४ दुकान गाळ्यांचे बांधकाम मनुष्यबळाअभावी कंत्राट पद्धतीने देण्यात आले. अधिकृत अंदाजपत्रकानुसार प्रति चौ.फुट दर रु. १९१६.०३ असताना सर्वात कमी निविदा सुमारे १३.८० टक्के कमी मिळाली. पुढील वाटाघाटीत आणखी रु. २५ प्रति चौ.फुट कपात करण्यात आली. रु. ८७५ दराची कोणतीही निविदा आलेली नसताना चुकीची माहिती पसरवून संस्थेची बदनामी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरण पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी अॅक्ट १९७२ नुसार देण्यात आले असून संस्था नफ्यात असल्याचा दावा करण्यात आला.

कापूस प्रक्रियेबाबत बैठकीला गणपूर्ती न झाल्याने निर्णय होऊ शकला नाही. नंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  कडे डिपॉझिट भरले; मात्र खर्चाचा अभ्यास केल्यानंतर प्रति गठाण किमान रु. १४५० दर मिळाल्यासच व्यवहार परवडणारा ठरेल, असा निष्कर्ष निघाला. सीसीआय  कडून कमी दर मिळत असल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.पत्रकार परिषदेला आमदार किसन वानखेडे, नितीन भुतडा, डॉ. विजय माने, माजी आमदार विजय खडसे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.डॉ. विजय माने यांनी विकासकामांत होणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांच्या हितासाठी रेशीम क्लस्टर उभारण्याचा पर्याय पुढे आणला. संस्था पारदर्शक कारभारास कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या