राजे शिवछत्रपतींच्या जयघोषात महागाव तालुका दुमदुमला; शिवजयंती उत्साहात साजरी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / १९ फेब्रुवारी 

महागाव : 

 

तालुक्यासह महागाव शहरात राजे शिवछत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध सामाजिक मंडळांच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक मंडळे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेतील त्यांची दूरदृष्टी आणि समाजहिताच्या कार्याची आठवण करून दिली.

शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी मिरवणुका, घोषवाक्ये, ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शिवरायांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शनपर भाषणेही आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा आणि समाजात एकात्मता, बंधुता व स्वाभिमान जपण्याचा संकल्प केला. महागाव शहरासह तालुक्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी माहोल पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या